सासू सुनेला मारहाण करीत अंगावरील सोने लुटले..

Foto
 गाढ झोपेत असलेल्या सासू-सुनेला मारहाण करीत अज्ञात चोरट्यानी  अंगावरी सोने लुटल्याची घटना बुधवारी मध्यरात्री वाळूज औधोगिक नगरीतील जोगेश्वरी शिवारात घडली.या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
चंद्रभागा हनुमंत इटकर व वैशाली सुनील इटकर असे जखमी सासू-सुनेचे नाव आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की,सासू चंद्रभागा व सून वैशाली हे दोन चिमुकल्यासह घरात झोपले होते तर घरातील कर्ता मुलगा हा कामाला बाहेर गेला होता.मध्यरात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास गाढ झोपेत असताना दोन चोरटे हे त्यांच्या घुसले व दोघे बाहेर थांबले. काही कळण्याच्या आतच दोघांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.व अंगावरील सुमारे सात ते आठ ग्राम सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला.ही घटना समोर येताच पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी घटनस्थळी पथकासह धाव घेतली. दुपारपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. चोरत्याना शोधण्यासाठी पोलोस परिसरातिल सीसीटीव्हीची  तपासणि करीत आहे. या घटनेमुळे वड्या वस्तीवर एकटे राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.